सोलापूर :
सुशीलकुमार शिंदे यांच्या निवडणुकीत मंगळवेढयाच्या 35 गावचा पाणी प्रश्न उपस्थित झाला, त्यात पालकमंत्री म्हणून विजयदादांनी समन्वय साधला होता असे स्पष्टीकरण आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिले.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ मरवडे येथे भव्य सभा झाली, यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,रयत क्रांती तालुका अध्यक्ष दीपक भोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,भाजपचे तालुका अध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, माजी सभापती प्रदीप खांडेकर,दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण, संचालक राजेंद्र सुरवसे, संचालक लक्ष्मण जगताप, प्रा.येताळ भगत ,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी मंगळवेढ्याच्या 35 गावचा पाणी प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मतांवर परिणाम होऊ नये म्हणून, भांडण मिटवण्यासाठी समन्वय साधला होता, निवडणूक झाल्यावर बैठक घेतली 35 गावांना पाणी देण्याचे नियोजन केले होते, त्यावेळी 4 टीएमसी पाण्याचे नियोजन होते, अजूनही नियोजन आहे, आता ही जबाबदारी समाधान आवताडे यांच्यावर सोपवायची आहे .
आजपर्यंतच्या निवडणूका या तिरंगी झाल्या, मात्र ही निवडणूक दुरंगीच आहे, सिद्धेश्वर आवताडे उभारले म्हणून तिरंगी समजू नका आम्ही त्यासाठी मागील तीन दिवसांपासून प्रयत्न केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही, परंतु एकदिलाने आवताडे यांनाच मतदान करा असे आवाहनही मोहिते पाटील यांनी केले.


















