सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे या गावी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजरत्न क्रीडा व युवक मंडळातर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीचे उद्घाटन सोलापूर काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुमठे गावातील युवक काँग्रेसचे जिवक इंगळे, निखिल हुवाळे, विकी नाईकवाडे, नागेश वाघमारे,गौतम सुरवसे, अजिंक्य चलवदे, सुनील बाळशंकर, अनिकेत सुरेकर, संदीप वाघमारे, सम्येक लालसरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.