सोलापूर : भारतीय जनता पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते सुरेश पाटील यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देण्यामागील आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि प्रवक्ते प्राध्यापक अशोक निम्बर्गी हे दोन नेते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेनंतर निम्बर्गी यांनी सुरेश पाटील यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. जर तुम्ही आई बापाला कंटाळला असाल तर काँग्रेस ही मावशी आहे ती तुमचा सांभाळ करेल या शब्दात काँग्रेसने पाटील यांना बोलावणं पाठवलं आहे.


















