सोलापूर ! राज्याचे माजी सहकारमंत्री भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या गावात सीना नदीवर ब्रिज कम बंधारा त्याचे तडकाफडकी भूमीपूजन केले शनिवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ते सोलापूर दौऱ्यावर होते त्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वात नदीवरील बंधारा यांचा विषय चर्चिला जाणार होता तिच्या बाजुलाच आहे एक दिवस अगोदरच भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी हा कार्यक्रम उरकला. सुभाष बापू जरी मी श्रेयासाठी काम करत नाही असे सांगितले असले तरी हा कार्यक्रम श्रेयवादासाठी होता अशी टीका राजकीय वर्तुळात होत आहे. शनिवारी शासकीय विश्रामगृहावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील बंधाऱ्यांची आढावा बैठक झाली या बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने,माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष काका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी सुभाष देशमुख यांच्या भूमीपूजनावर आक्षेप घेतला, पालकमंत्र्यांना निमंत्रण नाही, कोणत्या आमदाराला निमंत्रण नाही, बापूला एवढी घाई कशाला? पाणी अडवण्याची तांत्रिक मंजुरी आपली आणि श्रेय भाजपने का घ्यायचे असा सवाल जयंत पाटील यांच्या समोर उपस्थित करण्यात आला, ज्यापद्धतीने सीना नदीवर तिऱ्हे गावात ब्रिज कम बंधारा बांधला जातोय,तसाच दक्षिण तालुक्यातील वडकबाळ येथे सीना नदीवर बंधारा बांधावा, आपण पाणी अडवण्याची तांत्रिक मंजुरी देऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले. वडापुर बंधाऱ्यांची उंची वाढवण्याची गरज नसल्याची मागणी समोर आली, त्याऐवजी मोहोळ आणि दक्षिण तालुक्यात एका ठिकाणी बॅरेज बंधारे बांधून किमान 2 टीएमसी पाणी अडेल अशी सूचना करण्यात आली. आमदार संजयमामा यांनी भीमा, सीना नदीवर ज्या ठिकाणी बंधारे आवश्यक आहेत अशा सर्व ठिकाणचे सर्व्हे करण्याची सूचना केली तसेच ब्रिज कम बंधाऱ्या मुळे पाणी साठवण वाढणार आहे मात्र नद्यांवर मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे प्रशासनाची पूर नियंत्रण रेषेनुसार पाणी अडवता येईल अशीही सूचना पुढे आली.


















