सोलापूर ! काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात पार पडला. त्यानंतर सोलापूरच्या माध्यमांमधून तसेच राजकीय वर्तुळातून धवलसिंह मोहिते-पाटील हे भविष्यातील दक्षिण विधानसभा काँग्रेसचे उमेदवार असतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांची एकूणच तयारी पाहता तेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून दक्षिण मध्ये इच्छूक आहेत असे बोलले जात आहे. एकूणच या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी सहकार मंत्री तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या समोर काही पत्रकारांनी हा विषय छेडला असता बरं झालं की दक्षिण मध्ये सर्वच पक्षाचे उमेदवार वाढले पाहिजेत,
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे चांगले व्यक्ती आहेत त्यांना मानणारा दक्षिणमध्ये मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांनी निश्चितच काँग्रेसकडून भविष्यात दक्षिण विधानसभा लढवावी अशा शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेश पाटील सुद्धा प्रयत्न करत आहेत त्यांनी पण उमेदवारी घ्यावी,शिवसेनेची तर ताकद दक्षिणमध्ये जास्त आहे त्यांचा पण उमेदवार असावा, राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा प्रयत्न करत आहे त्यांनी पण निवडणूक लढवावी असे सुभाष बापू यांनी आपल्या स्वभावी ग्रामीण ढंगांमध्ये पत्रकारांना उत्तर दिले.
दक्षिण मध्ये भाजपचं कुठं काय हाय? मी काँग्रेस,राष्ट्रवादी, एमआयएम, रासप, शिवसेना, यांच्यामुळेच निवडून आलो असाही टोला त्यांनी विरोधकांना हाणला. दक्षिण सोलापूर तालुक्यात 34 टक्के जनता ही निरक्षर आहे उलट जेवढे उमेदवार वाढतील तेवढा गरीब लोकांचा फायदा होईल अन् माध्यमांना पण लाभदायक आहे.



















