सोलापूर – शिक्षकांनी कोविड काळात स्वच्छ सुंदर शाळा, मुला-मुलींची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिमेसाठी दिलेले योगदान महत्वपुर्ण आहे. येत्या ४ आॅक्टोबर रोजी शाळा सुरू होणार आहेत. कोरोना बाबत विद्यार्थ्यांचे आरोग्याची काळजी घ्या. असे भावनिक आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदे मधील निधी कक्षात शाळा सुरू होणेचे पार्श्वभुमीवर शिक्षण संवाद उपक्रमाचे आयोजन करणेत आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीबोलत होते. या प्रसंगी शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डाॅ. कोरडे, शिक्षणाधिकारी (माध्य ) भास्कर बाबर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, विस्तार अधिकारी हरिष राऊत, मुख्याध्यापक संघाचे तानाजी माने प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा अधिक गटशिक्षण्धिकारी , मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची काळजी घ्या- सिईओ दिलीप स्वामी
…………………………..
कोरोनाच्या काळात ज्या गरीब मुलांकडे मोबाईल नव्हता त्यांचे साठी पारावरच्या शाळा घेतल्या. पालकांची भेट घेऊन तिसरी लाटेचे पार्श्वभुमीवर मुलांची आरोग्य तपासणी केली. स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमांत ३ कोटी ७७ लाखा पेक्षा अधिक लोकवर्गणी गोळा करून आपण स्वच्छ सुंदर शाळा केल्या. चांगले योगदान दिले. एक पद एक वृक्ष लागवड केली. शाळा बंद असताना ही कामे केली. आता शाळा सुरू झालेनंतर विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांचे साठी भौतिक सुविधा तयार केल्या. त्यांना चांगले गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणे साठी प्रयत्न करा. त्यांचे चेहरावरील आनंद हेच तुमच्या कामाचे बक्षीस आहे. असे सांगून सिईओ म्हणून १० तालुक्यांतील शाळांची पाहणी केली आहे. करमाळाला मी जाणार आहे. तुम्ही पुर्ण ताकदी निशी विद्यार्थ्यांची काळजी घ्या असे भावनिक आवाहन केले.
शाळेतील स्वच्छता व सुविधा चांगल्या ठेवा- शिक्षणाधिकारी बाबर
………………….
प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी केले. ५ वी ते १२ वी चे वर्ग येत्या ४ आॅक्टोबंर पासून शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थीं शाळेत प्रदीर्घ कालावधी नंतर येत आहेत. त्यांची काळजी घ्या. शाळेतील स्वच्छता व सुविधा चांगल्या ठेवा. गुणवत्ता पुर्ण शिक्षणावर भर द्या. सिईओ दिलीप स्वामी यांनी शाळांसाठी दिलेला वेळ महत्वपुर्ण असल्याचे सांगितले.
स्वच्छ सुंदर शाळांचे सातत्य ठेवा- शिक्षणाधिकारी डाॅ. लोहार
…………………………
प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. लोहार यांनी शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी सुरू करा. स्वच्छ सुंदर शाळांचे सातत्य ठेवा. स्वच्छतागृहांची निगा राखा, मुलांना आनंदी वातावरणा बरोबर गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणेची जबाबदारी आपली आहे. आपण स्वत शाळांना भेटी देणार असल्याचे सांगितले.
आभार विस्तार अधिकारी स्वाती स्वामी यांनी मानले.

















