सोलापूर : एका गुन्ह्यातील आरोपीला उपचाराकरिता शासकीय रुग्णालय आणले असताना त्याच्या नातेवाईकांनी ओपीडी विभागासमोर मोठमोठ्याने गोंधळ घालत असताना त्याना येथे गोंधळ घालू नका असे सांगितल्याने आठ-दहा जणांनी मिळून तेथे सुरक्षेकरिता तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन जवानांना गंभीर मारहाण केली.ही घटना रविवारी दुपारी ११च्या सुमारास घडली.
या घटनेची हकीकत अशी की,रविवारी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास एका गुन्ह्यातील आरोपीस उपचाराकरता शासकीय रुग्णालयात आणले असताना तेथे त्या आरोपीचे आठ ते दहा नातेवाईकांनी येऊन मोठमोठ्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.त्यावेळी तेथे कर्तव्य बजावत असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सुनील गोरख रिसोड (वय-२८ रा.सिव्हिल हॉस्पिटल व त्यांचे सहकारी अतीश राठोड यांनी येथे गोंधळ घालू नका.असे सांगून त्यांना रूम बाहेर काढले,असता आरोपीने फिर्यादी व अतिश राठोड यास शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीचे पाय धरुन खाली पाडले.
तसेच छातीवर बसून हाताने मारहाण केली.गळ्यास,नाकास व उजव्या कोपर्यावर मार लागला.गणवेशाची दोन बटणे तुटली,शोल्डर पट्टी तुटली,शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सिकंदर रामसिंग कजागवाले (वय-४८ रा.बापुजी नगर व इतर तीन जण (नाव पत्ता माहीत नाही) अशा चौघांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.


















