सोलापूर : जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्ता जनसंपर्क मोहीम अभियान अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी या गावात मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या भाषणात दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच चिमटे काढले.
बाळासाहेब शेळके यांनी आपल्या भाषणात सुरेश हसापुरे यांना उद्देशून हसापुरे हे कोणता रसायन आहे हे आजपर्यंत कुणालाही समजलं नाही असे म्हणत एकत्रित येऊन काम करू आणि पक्षाला मजबूत करू अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र जेव्हा म्हेत्रे भाषणाला उठले तेव्हा त्यांनी हसापुरे यांचा हा कार्यक्रम पाहून ही तर जिल्हा परिषद निवडणूकीची सभा असल्याचे सांगितले तर केवळ सुरेश हसापुरे हेच अजब रसायन नाही तर दक्षिण तालुक्यातील सर्वच नेते हे अजब रसायन आहेत कुणाच्या मनात काय चालत हे कधीही समजत नाही.
शेळके, हसापुरे, हरीश पाटील, भीमाशंकर जमादार यांना बोलताना या चौघांचा डोक्यावर केस कमी आहेत आता दोघांनी टोप्या घातल्या आहेत त्यामुळे हसापुरे शेळके यांनी पण टोप्या घालाव्या अन्यथा डोक्यावरून हात फिरवल्यास कुणाची गेम करतील ते समजत नाही अशा भाषेत त्यांनी चिमटे काढले


















