सोलापूर : काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते दुपारी शासकीय विश्रामगृहावर त्यांच्या विभागाच्या बैठका होत्या त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते याच दरम्यान अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे काही जणांसोबत बाहेर थांबून होते दरम्यान नेतेमंडळी वाढल्याने म्हेत्रे यांनी दुसरा सूट उघडण्यास सांगितला.
त्या ठिकाणी हॉलमध्ये सर्वजण जाऊन बसले म्हेत्रे यांच्या बाजूला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके पंढरपूरची तालुकाध्यक्ष प्रकाश तात्या पाटील हे बसले एका बाजूला अर्जुन तात्या पवार, मंगळवेढ्याचे अविनाश शिंदे, दक्षीणचे बसवराज बगले ही नेते मंडळी बसली यावेळी पत्रकारांनी शेळके सध्या तुमच्याजवळ दिसत आहे हसापुरे कुठे आहेत? असा प्रश्न केला असता शेळके जवळ आले की हसापुरे लांब पळतात आणि हसापुरे जवळ आले की शेळके लांब असे म्हणून आपल्या खेचाखेचीला सुरुवात केली.
तसे पाहिले तर बाळासाहेब शेळके माझे जूने मित्र त्यानंतर अशोक देवकते राजशेखर शिवदारे हे मित्र… सुरेश हसापुरे आत्ता आले आहेत परंतु सर्व माझेच आहेत असे सांगितले. यावेळी बोलताना म्हेत्रे यांनी बाळासाहेब शेळके यांची चांगलीच खेचली तसे पाहिले तर आनंदराव देवकते यांचे खरे वारसदार अशोक देवकते मात्र बाळासाहेब शेळके यांनी अतिक्रमण केले असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला याचवेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे हॉलमध्ये आगमन झाले या या अध्यक्ष आता इथं सर्व माजी होते,आता तुमची पण भर पडली तेवढ्यात पंढरपूरचे प्रकाश तात्या पाटील यांनी मात्र आता आपण माजीच राहणार आपल्याला संधी मिळणार नाही असे नाराजीने सांगितले त्यांच्या चेहऱ्यावर व बोलण्यातून नूतन जिल्हाध्यक्ष निवडीची नाराजी स्पष्ट दिसत होती. याठिकाणी दोन-दोन प्रकाश आलेत तिसरा प्रकाश कुठे आहे असे म्हणताच शहराचे अध्यक्ष प्रकाश वाले यांची हॉलमध्ये इंट्री झाली या या तुम्ही फक्त आजी आहात आम्ही सर्व माजी आहोत असे म्हणून म्हेत्रे यांनी वाले यांची टर उडवली तेवढ्यावर गप्प न बसता म्हेत्रे यांनी प्रकाश वाले यांचे काळे केस आणि पांढऱ्या मिशीवर सुद्धा भाष्य केले पांढर्या मिशा ठेवणाऱ्यांचे नशिब असते जेव्हा अमिताभ बच्चन यांनी मिशी आणि दाढी पांढरी ठेवले तेव्हापासून ते मालामाल आहेत म्हणूनच प्रकाश वाले हे पांढरी मिशी ठेवतात का असे म्हणतात सर्व उपस्थितांमध्ये हस्यांचे फवारे उडाले.
जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांचे आगमन झाले त्यांना मात्र प्रकाश तात्यांनी शेजारी बसवले, खुर्ची दिली तेव्हा लगेच पत्रकारांनी दुसरा कार्याध्यक्ष आल्यावर खुर्ची देणार का असे म्हणतात प्रकाश वाले यांनी म्हेत्रे यांना उद्देशून नाही ते लाडके आहेत त्यांना थेट मांडीवर बसून घेतील असे म्हणून म्हेत्रे यांची खेचली. उपस्थित एका ज्येष्ठ नेत्याने म्हेत्रे यांच्या अक्कलकोट पराभवाचे चिंतन सुरू केले, तेव्हा म्हेत्रे यांनी बस्स झाले आता जिल्हा परिषदेला आपले सगळे कार्यकर्ते निवडून आणायचे असे म्हणताच समोरच्या एकाने मात्र आजही लोक तुम्हाला मानतात, तुमच्या शिवाय पर्याय नाही असे सांगितले.
दरम्यान गप्प बसलेल्या बाळासाहेब शेळके यांनी ही बोलण्याची संधी सोडली नाही, अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे साहेब एकटेच नेते आहेत असे म्हणताच बळोरगी यांना आवडले नाही मी नेता नाही का?अशी नाराजी व्यक्त केली मात्र शेळके यांनी नेते आहेत पण नेतृत्व एकच आहे साहेबाना मोठा वर्ग मानतो पण दक्षिण मध्ये साहेबांनी नेते वाढवले म्हणून गटबाजी वाढली असे सांगून आपली मनातील नकळत खदखद व्यक्त केली.
एकूणच या मजेदार चर्चेमधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील गटबाजी त्यामुळे पक्षाचे झालेली अवस्था याचे मजेदार पणे चिंतन तर झालेच मात्र सत्य परिस्थिती समोर आली.
















