सोलापूर : शेतकरी आणि मुक्या जनावरांच्या हक्काचे पाणी दगडखाण मालक चोरत होता ही बातमी शुक्रवारी प्रसिद्ध झाली या बातमीची जिल्हा परिषदेने दखल घेत त्वरित पाणी चोरी थांबवली आहे .
‘सिंहासन’ ने शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारात असलेल्या जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातील पाणी एक राजकीय नेता आपल्या पदाचा गैरवापर करून मागील काही दिवसांपासून आपल्या दगड खाणीत बेकायदेशीर पणे तलावात चार मारून व सांडवा फोडून नेत होता. याची ऑन द स्पॉट व्हिडीओ चित्रणासह बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली. त्यांनी त्वरित लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पंडित भोसले व दक्षिण सोलापूर तालुक्याचे उपअभियंता मुनाफ अडते यांना चौकशी करण्याच्या सूचना केल्या.
शनिवारी उपअभियंता अडते व शाखा अभियंता पी डी डोके यांनी जागेवर जाऊन भेट दिली पाहणी केली असता पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. त्वरित या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून तलावात चर मारलेली बुजवली व मुरूम टाकून ते पसरवून घेतले, त्यामुळे आता चर मधून तलावातील पाणी जाणे थांबले आहे. बेकायदेशीर पणे मारलेली चर बुजवण्याच्या सूचना संबंधित खाण मालकाला केल्या आहेत.
पाणी चोरल्या प्रकरणी आता जिल्हा परिषदेचे पाटबंधारे विभाग कोणती कारवाई करणार? पाणी चोरीवर कोणता कायदा आहे, हा दगड खाण मालक सत्तेतील राजकीय पक्षाचा मोठा पदाधिकारी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची डेरिंग जिल्हा परिषद करणार का? या सर्व गोष्टी कडे ‘सिंहासन’चे लक्ष राहणार आहे.

















