सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर मधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या मुलाच्या लग्नाला जयंत पाटील यांची उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबून जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधला. महाराष्ट्र सदनात जयंतीसाठी अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले याचा पुतळा हटविल्याने, महाराष्ट्र राज्यात जनता सरकारच्या विरोधात निषेध करत आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.
यावेळी काही स्थानिक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात जात आहेत यावर प्रतिक्रिया विचारले असता पाटील म्हणाले,
शिंदे गटात गेले आहेत, ते लोक फक्त सत्ता असेपर्यंत राहतील, सवलती, व निधी घेऊन परत येतील, तिकडे गेलेल्या लोकंबाबद्दल आम्ही जास्त बोलत नाही, एका कार्यककर्त्याने सांगितले, साहेब सहा महिने जातो, आणि निधी घेऊन येतो असे म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, पहा काय म्हणाले जयंत पाटील…



















