राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार येऊनही मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव झाला, पूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र भारतीय जनता पार्टीने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला सोलापूर जिल्ह्यात तब्बल आठ आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत यावरून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर
सोलापूर जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बांधणी असेल, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कमी होत असलेली ताकद, आगामी विधान परिषद, किंवा आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका असतील या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचा सह सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष काका साठे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, उत्तमराव जानकर, भगीरथ भालके, निरंजन भूमकर, लतीफ तांबोळी अशा प्रमुख कार्यकर्त्यांची या बैठकीला उपस्थिती होती, या बैठकीमध्ये पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या विरोधात तक्रारी पुढे आल्या विशेष करून जिल्हा नियोजन समितीकडून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना अपेक्षित निधी दिला जात नाही, ते निधी देताना एका विशिष्ट समाजाचा विचार करतात, पक्षावाढीबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष नाही, त्यात त्यांनी सुधारणा करावी अशा तक्रारी केल्याचे सांगण्यात आले, सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे अशी मागणी पुढे आली, एकूणच सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी पालकमंत्री भरणे मामा यांना सबुरीचा सल्ला देत सर्वांना सोबत घेऊन आणि समन्वयाने काम करण्याच्या सुचना केल्याची माहिती मिळाली.