सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. क्र. २ या संस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १७/०६/२०२३ रोजी संपन्न झाली असून सर्व प्रथम प्रमुख पाहुणे लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबासाहेब करांडे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन यांनी केले. नंतर प्रमुख पाहुणे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन सभेस सुरुवात करण्यात आली.
चेअरमन यांनी अहवाल वाचन करणेपुर्वी अहवाल वर्षांत जे आजी-माजी सभासद तसेच त्यांचे नातेवाईक, देशाचे जवान सर्व क्षेत्रातील ज्ञान अज्ञात थोर व्यक्ती, कार्यकर्ते स्वर्गवासी झाले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नंतर अध्यक्षीय भाषण लेबर फेडरेशनचे चेअरमन यांनी उपस्थित सर्व सभासदांना उत्कृष्ट पध्दतीने मार्गदर्शन केले. संस्थेने कर्ज मर्यादा वाढ करणे पेक्षा सभासदांना वेळेत कर्ज देणेचे सभासद हिताचे निर्णय घेणे, नवीन सभासद वाढ करणेचे आवाहन केले.
नंतर सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करणे आला. तसेच इ.१०वी, इ.१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सभासदांना लाभांष ५.५% देण्यात आला. सभेस उपस्थित असलेले संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
सभेला संस्थेचे चेअरमन श्रावण मोरे, व्हा. चेअरमन श्रीकांत धोत्रे, मानद सचिव गिरीष जाधव, खजिनदार विलास माने, तसेच संचालक रणजित घोडके, सुधाकर माने-देशमुख, सुनंदा जाधवर, श्रीकृष्ण घंटे, श्रीमती. राणी सुतार, एस. बी. म्हेत्रे, व्हि.डी. राऊत आदी उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचालन मानद सचिव गिरीष जाधव यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्रावण मोरे यांनी केले. संस्थेचे सभा खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. उपस्थित सर्व सभासदांचे संस्थेचे संचालक रणजित घोडके यांनी आभार मानले.




















