सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला यापूर्वी ते सातारा जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत होते, सोलापूर झेडपीत आल्यापासून त्यांनी कृषी विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत झोकून देऊन काम सुरू आहे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध आवास योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत,
बांधकाम, समाज कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण असे महत्वाचे विभाग त्यांच्याकडे असून त्यांनी या विभागाच्या कामांचा स्पीड वाढवला आहे सोलापूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या निरोप समारंभ आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा परिषद मध्ये झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीय विधाते मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश घुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव पुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदय कबुले म्हणाले, ‘करोना काळात धोत्रे यांनी केलेले काम जिल्हा कधीच विसरु शकणार नाही. अखत्यारित असलेल्या विभागातील कामे, योजनांना गती देण्याचे काम धोत्रे यांनी केले. अधिकारी- पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत जिल्ह्याला साजेसे काम त्यांच्याकडून झाले. त्यांनी विविध विभागांचा समन्वय साधत चांगले काम केले आहे. प्रशासनावर मजबूत पकड़ ठेवत पदाधिकारी, सदस्य, सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी त्यांनी सोडवल्या.’ धोत्रे यांना प्रशासनातील अनुभव चांगला असून त्यांनी सर्वांशी समन्वय ठेवून दिशादर्शक असे काम केले,
संतोष धोत्रे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेत चांगल्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे दुष्काळ, पाणटंचाईच्या काळात चांगले काम करता आले. जिल्हा परिषदेला लाभलेले पदाधिकारी आणि अधिकारी एकत्र येऊन काम करतात. त्यामुळेच जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढला आहे. येथील कामातून आलेल्या अनुभवावर सोलापूरमध्ये काम करणार आहे.’


















