सोलापूर – जीवन ज्योती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नाथ प्रशाला शांती नगर, सोलापूर येथील क्रियाशील मुख्याध्यापक सातलिंग शटगार यांना लायन्स क्लब सोलापूर सिटी तर्फे आदर्श मुख्याध्यापक म्हणून माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते सुधीर खरटमल अध्यक्ष मोहन भूमकर आनंद पूनामिया यांच्या उपस्थितीत होटेल समृद्धी येथे स्मृतिचिन्ह, शाल, प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना दिलीप माने म्हणाले, शटगार हे बहुआयामी व्यक्ती असून राजकारणा पेक्षा सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे गेल्या २५ वर्षापासून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या सामाजिक क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचे मोठे काम केले, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे मोठे काम आहे. सलग १००% निकाल, बोर्ड परीक्षांचे कामकाजा बरोबर ते भरारी पथकाचे सदस्य म्हणूनही कार्यरत असतात. व्यवसायाने ते मुख्याध्यापक असले तरी ते पत्रकारितेतील मास्टर आहेत.
सुधीर खरटमल म्हणाले, शटगार कोणतेही काम करत असताना, मनापासून काम करतात आणि ते यशस्वी करून दाखवतात ते स्वाभिमानी आणि निस्वार्थी व्यक्तिमत्व आहेत. शटगार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

















