सोलापूर – सोलापूर येथील फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी अनिल विठ्ठल पवार यांना दिनांक 20 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीयुत राणे यांनी 50 हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, फिर्यादी यांनी आरोपीस शेतातील ऊस तोडणी करिता रुपये 5 लाख 50 हजार रुपये दिले होते. परंतु यांना सदर रक्कम घेऊन देखील ऊस तोडणी देखील केली नाही व आगाऊ कामापोटी दिलेली रक्कम ही परत दिले नाही व तसेच रक्कम न दिल्याने भारतीय दंडविधान संहिता कलम 420,504,506 अन्वये फिर्याद दिली.
त्याप्रमाणे आरोपीस अटक करून मेहेरबान कोर्टात हजर केले व जिल्हा व सत्र न्यायालयाकडे सदर आरोपीच्या वतीने जामीनाचा अर्ज दाखल करून त्यात सदरचा गुन्हा हा दिवाणी स्वरूपाच असून आरोपी व त्यांचे मजूर फिर्यादीच्या शेतात काम केल्याबाबत प्रतिज्ञापत्र, ऊसतोडणी च्या पावत्या मेहेरबान कोर्टात सादर करून आरोपीचे वकील मोहन कुरापाटी यांनी युक्तिवाद केले असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहेरबान कोर्टाने 50 हजाराच्या जातमुचल्याकवर जामीनाचा अर्ज मंजूर केले. या मध्ये सरकार तर्फे वकील शैलजा क्यातम तर आरोपी तर्फे अँड.मोहन कुरापाटी व अँड.अनिल वासम यांनी काम पाहिले.