सोलापूर : सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत प्रस्ताव आणि नोंदणी, नुतणीकरण व विविध योजनेअंतर्गत अर्ज न स्विकारणे, स्विकारलेले अर्ज दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित ठेवणे, तपासणी न करणे, शासन अनुदान रकमेचे वाटप न करणे लिपीक किर्ती देऊळकर, टी. डी. शेख, महेश लिंबोळे यांचेकडून रकमेची मागणी करणे इत्यादी तक्रारी आर. टी. आय. कार्यकर्ते गणेश बोडू यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व महाराष्ट्र शासनाकडे दाखल केली होती.
या तक्रारीस अनुसरुन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांना एकामागे एक असे ४ नोटीसा काढून बैठकीला उपस्थित राहणेबाबत कळविले होते. या बैठकीला निलेश येलगुंडे हे गैरहजर राहून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केले होते. शासनाने देखील दखल घेतली नाही.
शवेटी आर. टी. आय. कार्यकर्ते गणेश बोड्डू यांनी सोलापूर येथील सिव्हील जज्ज सिनियर डिव्हीजनल यांच्या कोर्टात दावा दाखल केला होता. सदर दाव्यात दिनांक १९/०६/२०२१ रोजी सुनावणी होवून सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन मुंबई यांना मे. कोर्टाने नोटीस काढून दिनांक २३/०७/२०२१ रोजी मा. कोर्टात हजर राहण्याचे आदेश केले आहे. अशी माहिती आर. टी. आय. कार्यकर्ते गणेश बोड्डू यांनी दिली आहे.


















