सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागून साधारण एक महिना होऊन गेला अजून पंधरा दिवस संचारबंदी आहे तब्बल दीड महिना हून अधिक संचारबंदी असल्याने कामगार कष्टकरी हातावर पोट असलेले विडी कामगार महिला बांधकाम कामगार यंत्रमाग कामगार धुणीभांडी करून खाणारे महिला यांना बचत गटाचे हप्ते भरण्यासाठी सध्या पैसे नाहीत अशी परिस्थिती असताना मायक्रो फायनान्स वाले जाणीवपूर्वक नागरिकांना त्रास देत आहेत ते वसुलीसाठी तगादा लावत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावली होती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्यासह संभाजी आरमार चे श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी जमीर शेख यांच्यासह इतर संघटना व मायक्रोफायनान्स चे प्रतिनिधी उपस्थित होते , बैठकीनंतर आमदार प्रणिती शिंदे प्रहारचे अजित कुलकर्णी,संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, जमीर शेख यांनी माहिती दिली.
जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सोलापुरात 31 मेपर्यंत साहित्य बंदी आहे त्या काळात एकाही मायक्रोफायनान्सने बचत गटाचे हप्ते महिलांकडून वसूल करायचे नाहीत असा आदेश काढला आहे त्यामुळे कोणत्याही मायक्रो फायनान्स नाही हप्ते वसुली करू नये असे आमदार शिंदे म्हणाल्या.
जर कोणत्या मायक्रोफायनान्सच्या प्रतिनिधीने हप्ता वसुलीसाठी महिला व कामगारांकडे तगादा लावला तर त्यांना धडा शिकवू असा इशारा प्रहार व संभाजी आरमारने दिला



















