श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी कशी जपावी .या साठी एक मूठ धान्य या संकल्पनेच्या आधारावर प्रत्येक विद्यार्थ्यांकडून आपल्या स्वइच्छेने गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, रवा, साखर, हरभरा डाळ, दिवाळीसाठी लागणारी उटणे, साबण, तेल ,आकाश दिवा अशा अनेक विविध वस्तू देण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. विद्यार्थ्यांकडून उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे.
या प्रतिसादातून 45 किलो गहू, 45 किलो तांदूळ, 35 किलो साखर 25 किलो रवा ,पाच किलो हरभऱ्याची डाळ इतर डाळी, तेल, पणत्या, आकाश दिवे इत्यादी अनेक गोष्टींची साठवणूक झाली. आणि या सर्व वस्तू प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसन्न मोहिते यांना प्रार्थना फाउंडेशन मध्ये असणाऱ्या अनाथ बालकांना घेऊन त्यांच्या हाती या सर्व गोष्टी सुपूर्त करण्यात आल्या आहेत.
प्रार्थना फाउंडेशन हे मोहोळ तालुक्यामध्ये मोरवंची या गावी आहे .या फाउंडेशन मध्ये एकूण 45 अनाथ बालके व 22 वृद्ध महिला व पुरुष असल्याचे त्यांनी सांगितले. या अनाथ बालकांनी व वृद्धांनी आनंदामध्ये दिवाळी साजरी करावी. हा या अभिनव उपक्रमाच्या पाठीमागचा हेतू आहे. हा अभिनव उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे यांनी पुढाकार घेतला व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांनी उत्तम प्रतिसाद दिला. व सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्तम असा प्रयत्न केला. शालेय शिक्षण समितीचे सदस्य येळीकर सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.