सोलापूर : क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाज सन्मान परिषदेचे आयोजन दिनांक 24 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे, हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे, संस्थापक, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना शंकर तडाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या परिषदेमध्ये कोव्हीड- १९ महामारीच्या काळात अहोरात्र कष्ट घेणा-या व्यक्तींना वैद्यकीय सेवा क्षेत्रातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सन्मान पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. ऋत्विक जयकार, डॉ. औदुंबर मस्के, डॉ. अतिश बोराडे, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेविका फिरदोस पटेल, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, आरोग्य कर्मचारी मा. भिमराव गायकवाड, मा. राजु डोलारे, मा. लादेन शेख, पोलीस कर्मचारी प्रभाकर देढे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तनाचे कार्य करणा-या समाजातील व्यक्तींना साहित्य व प्रबोधन क्षेत्रातील ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सन्मान पुरस्कार २०२१’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रा. दिगंबर झोंबाडे, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, प्रा. परमेश्वर हटकर, प्रा. श्रीधर कांबळे, प्रा. दशरथ रसाळ, प्रा. कमलाकर डोलारे, प्रा. अनिल लोंढे, यांना सन्मानित करण्यात येणार आहे.



















