मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थ संकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या होत्या. यात १ रूपयात पीक वीमा योजनची मोठी चर्चा झाली होती. ही फक्त घोषणाच आहे अशा पद्धतीची टिकाही विरोधकांनी केली. परंतु आता या योजनेचा फायदा होताना दिसतोय. २२ जिल्ह्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ही रक्कम अग्रिम आहे, अंतिम नाही. यामुळे अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री असताना त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. आज प्रत्यक्षात याची अमंलबजावणी होऊन शेतकऱ्यांना फायदा होताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळीसणात याचा मोठा आधार मिळेल.
काय आहे योजना
२०१६च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरत आहे. यासाठी वार्षिक ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमुळे शेतकर्यांवर याचा आता कोणताच भार नाही. शेतकऱ्याला फक्त १ रुपये भरून पोर्टलवर नोंदणी करावी लागते.