सोलापूर महानगरपालिकेचे नूतन सभागृह नेतेपदी शिवानंद सिद्रामप्पा पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम व भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी नूतन सभागृहनेते शिवानंद पाटील याचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सभागृहनेते श्रीनिवास करली, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, नगरसेवक नागेश भोगडे,अजित भाऊ गायकवाड, श्रीनिवास पुरुड, व्यंकटेश कोंडी आदी मान्यवर उपस्थित होते. नूतन सभागृहनेते शिवानंद पाटील हे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे अत्यंत निकटवर्ती कार्यकर्ते समजले जातात. सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी ची सर्व कामे तसेच दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे नूतन सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी निवडीनंतर सांगितले.


















