सोलापूर : भाजपाचे युवा नगरसेवक नागेश भोगडे यांच्याकडे तीन दिवसाचे सभागृहनेत्याचा पदभार पक्षश्रेष्ठींनी दिला असून शुक्रवारी होणा-या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नागेश भोगडे सभागृह नेता म्हणून पाहावयास मिळणार आहेत…
सोलापूर महानगरपालिकेचे सभागृहनेते शिवानंद पाटील मागील तीन दिवसांपासून आपल्या खाजगी कामाकरता बाहेरगावी गेले आहेत त्यामुळे पालिकेच्या पक्षनेते पदावर तीन दिवसाचे हंगामी सभागृह नेते म्हणून नागेश भोगडे यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून करण्यात आली आहे पक्षाचे शहराध्यक्ष जेष्ठ नेते आमदार विजयकुमार देशमुख आणि विद्यमान सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्या समतीचे पत्र नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे दिले असल्याचे सांगण्यात आले .
दरम्यान गुरूवारी सभागृह नेते म्हणून नागेश भोगडे यांनी पार्टी मिटिंग घेताना दिसून आले तर शुक्रवारी पालिकेची सर्वसाधारण सभेत नागेश भोगडे हे सभागृह नेते म्हणून दिसणार असल्याने पालिकेच्या वर्तुळ भल्या भल्यांच्या भुवया उंचावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत..
















