सोलापूर (प्रतिनिधी) ६ जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार असून शिवस्मरण केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित ठेवणे योग्य नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साजरा करण्या ऐवजी राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ही साजरा करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी राजांनी राज्याभिषेक करुन घेऊन जगमान्य होण्यासाठी रयत शिवरायांपाशी आग्रही होती.
या सुवर्ण सोहळ्याची नोंद जगभरात झाली होती.
रयतेच्या राज्याच गौरवार्थ स्मरण होण्यासाठी यंदाच्या वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ६ जून हा “शिवराज्याभिषेक दिन” हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करावयाचा आदेश शासनाने दिले असून या निमित्ताने भगवा ध्वज 🚩 या पध्दतीचा (सिंगल पताका) उभा करायचा आहे.
तरी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवक, पंचायत समितीचे सभापती/ गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासन आदेशाचे पालन करावे असे नमूद केले असून
शासन आदेशात नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांंचा उल्लेख केला नाही तरी नगरविकास विभागाने वरील नागरी संस्थांना ही हा दिन साजरा करण्यात यावे असा सुधारित आदेश काढावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे अरविंद शेळके, सिताराम बाबर, महेश माने, विठ्ठल जाधव, गजानन शिंदे, महादेव जाधव, प्रदीप कोळी इलियास शेख ईत्यादी उपस्थित होते.
















