सोलापूर : देशभरामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आले पण राज्यातील मंदिर मात्र करोनाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहर भाजपाच्यावतीने बाळीवेस येथील मल्लिकार्जुन देवळासमोर दार उघड दार उघड असा निनाद करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शंखनाद करून आंदोलन करण्यात आले, आमदार विजयकुमार देशमुख हे आजारी असल्याने आमदार म्हणून सुभाष देशमुखांनी आंदोलनाचे नेतृत्व केले,
देशमुखांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना, शिवसेनेने हिंदुत्वाची फारकत घेतल्यामुळेच राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकत नाहीत. हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यावरच शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत युती केली, सत्ता स्थापने वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदुत्व गुंडाळून ठेवण्याची अट घातली होती, म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेऊ शकत नाहीत असा थेट आरोप बापूंनी केला.



















