सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्या रूपात आक्रमक अशा राज्याच्या प्रवक्त्या मिळाल्या आहेत. ठाकरे गटावर कोणतीही टीका करण्याची संधी त्या सोडत नाहीत. कर्नाटक मध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता आली. त्या ठिकाणी सत्ता स्थापनेवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आले नाही. तोच धागा पकडत प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांचा उल्लेख उध्वस्त ठाकरे व आदित्य ठाकरे यांना ओसाड नगरीचे राजकुमार असा उल्लेख करत “घरात नाही दाना, पण मला हवालदार म्हणा” या भाषेत त्यांनी तोफ डागली, आता या टीकेवर सोलापुरातील ठाकरे शिवसेनेचे नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान ज्योती वाघमारे नक्की काय म्हणाल्या पहा हा व्हिडिओ…

















