या निवेदनात त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी व सोलापूर महानगरपालिकेचा नगर विकास खात्याकडे पाठवलेला आकृतिबंध प्रस्ताव मंजूर करून 22 रोजंदारी वाहनचालकांना कायम करून त्यांना सामावून घेण्या संदर्भात मागणी केली आहे. विषय महत्वाचा असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले.
सोलापूर शहरातील पक्षाची परिस्थिती पाहिली तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना चलबिचल आहे. ठोस असा कोणताही कार्यक्रम किंवा धोरण दिसत नाही,वरिष्ठांनी जवळजवळ सोलापूर कडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे.

















