“मराठा, धनगर, ओबीसींच्या आरक्षण मागणीला विरोध नाही मात्र आमच्या मूळ व्हीजेएनटीच्या 14 जातींना शेड्युल बी मध्ये कन्व्हर्ट करा अशी प्रमुख मागणी आमदार संजय राठोड यांनी केली”.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे आमदार संजय राठोड आता सक्रिय झाले असून व्हीजेएनटी समाजातील मागण्यांसाठी ते आता आक्रमक झाले आहेत. सोलापूरात त्यांनी बंजारा समाजाचा मेळावा घेतला या मेळाव्यानंतर आमदार संजय राठोड यांनी शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी मागील अनेक वर्षांपासून समाजाच्या मागण्या घेऊन शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मागणी केली आहे. पुन्हा लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याचे सांगत मूळ व्हीजेएनटीला 14 जातींना शेड्युल बी मध्ये कन्व्हर्ट करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तुमच्यावर आरोप झाले, तुम्ही राजीनामा दिला मात्र धनंजय मुंडे प्रकरणात त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही असे का त्यावर त्यांचा चेहरा गंभीर झाला व ते काय म्हणाले पहा व्हिडीओ



















