सोलापूर – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करताना टप्याटप्याने जनजीवन सुरळीत होण्यासाठी उद्योग धंदे तत्सम अन्य आवश्यक बाबीं सुरू करण्यास सरकार परवानगी देत आहे मात्र शाळा,महाविद्यालय व शैक्षणिक संस्था सुरू करण्यास विलंब का लावत आहे ? यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धती मुळे गरिबांच्या मुलांना विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे हे अत्यंत गंभीर आहे.तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.योग्य वैद्यकीय शिक्षण , गुणवत्तापूर्ण आणि अद्यावत चिकित्सक ज्ञाना अभावी अनेक चुकीच्या घटना घडत असल्याची माहिती पुढे येत आहे.याला काणाडोळा करून चालणार नाही.याला सरकारचे शैक्षणिक धोरण कारणीभूत असल्याची टीका स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.पी.सानु यांनी केले.
देशव्यापी शिक्षण बचाव परिषद दौरा निमित्त शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.पी.सानु (केरळ)तसेच राज्याचे अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव हे सोलापूर ला आले होते त्यावेळी ते शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधले.
यावेळी जिल्हासचिव मल्लेशम कारमपुरी, शाम आडम,अश्विनी मामड्याल,पूजा कांबळे,दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते.

















