आजपर्यंत राजकारणात पोस्टर वरून अनेक वेळा गोंधळ उडाला आहे, काही ठिकाणी महापुरुषांचे फोटो नाहीत, काही ठिकाणी नेत्यांचे फोटो नाहीत, काही ठिकाणी नावे नाहीत, पक्षाचे चिन्ह नाही, गोंधळ, पाहिला, नाराजी पाहिली, काही ठिकाणी तर कार्यक्रम रद्द करावे लागले, माफीनामा होतो, दिलगिरी व्यक्त होते. सोलापूरात एमआयएम पक्षाचे 10 नगरसेवक आहेत, एक शहराध्यक्ष आहे, महापालिकेत गटनेता आहे, असे असताना ही फारूक शाब्दी व गटनेता रियाज खरादी हे एमआयएम चे नाहीत का?अशा एका प्रश्नाने सोलापूर मधील कार्यकर्ते सध्या संतप्त आहेत. त्याला कारण ही तसेच आहे, महापालिकेचे एमआयएम गटनेते रियाज खरादी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आपल्या प्रभाग 14 मध्ये करण्याचे ठरवले आहे, त्यात फारूक शाब्दी यांचा फोटो आहे, विशेष म्हणजे लसीकरण उद्घाटन शाब्दी यांच्या हस्ते आहे, त्यात स्वतः रियाज खरादी यांच्यासह त्यांचे चिरंजीव जे परिवहन सदस्य आहेत त्यांचा फोटो आहे, महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचा ही फोटो आहे, या पोस्टर मध्ये एमआयएम शहराध्यक्ष आहे, गटनेता आहे, त्याच पक्षाचा परिवहन सदस्य आहे पण एमआयएम कुठे आहे?या पोस्टर वरून मोठा वाद निर्माण झाला आहे, गटनेत्यांना पक्षाचे महत्व नाही का? या पोस्टरवर कुठे ही एमआयएम शब्दाचा उल्लेख नाही, पक्षाचे चिन्ह नाही, पक्षाचे नेते ओवेसी बंधू यांना तर स्थान दिले गेले नाही, मग शाब्दी यांनी या कार्यक्रमाला का जायचे? असा प्रश्न एमआयएम च्या संतप्त कार्यकर्त्यांमधून आहे.
















