सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी रेनगरला भेट देऊन या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली.यावेळी त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरणही करण्यात आले.
यावेळी नरसय्या आडम म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारत असलेल्या रेनगर गृहप्रकल्पाकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वी शरद पवार-सोनिया गांधी यांच्या पर्यंत गेलो मात्र त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले त्यांचे या प्रकल्पास संपूर्ण सहकार्याची त्यांची भूमिका आहे.
हा प्रकल्प 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या प्रकल्पासाठी पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी 300 कोटी मंजूर आहेत. या कामांच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावे यासाठी आमचा जोरदार पाठपुरावा आहे, पण आचारसंहिता आदी कारणांमुळे ते येऊ शकले नाही.
या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी यावेत, यादृष्टीने पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पहा आडम काय म्हणाले…



















