सोलापूर ! भारतीय जनता पार्टीची तोफ म्हणून समजले जाणारे, धनगर समाजाचे आक्रमक नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सोलापूर दौरा केला हा दौरा सोलापूरकरांसह गोपीचंद पडळकर यांच्या आठवणीत राहणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन टीका केली याचे पडसाद सर्वत्र उमटले.
दगडफेक झाली, गाडी फोडली, कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, ठिय्या मांडला, दुसऱ्या दिवशी गोपीचंद पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली, दोन दिवस शहर व जिल्ह्यात फक्त गोपीचंद पडळकर यांची चर्चा झाली. पवारांवर केलेल्या टीकेनंतर पडळकर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या हातात बेड्या आहेत त्यांच्या शेजारी एक जोडीदार बसलेला आहे या दोघांच्या हातात एकच बेडी घातल्याचा फोटो आहे. त्यावेळी पडळकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते.
हा फोटो 2014 साली सांगली तालुक्यातील आटपाडी पोलिसांकडून पडळकर यांना अटक झाली होती त्यावेळेचा हा फोटो असल्याचं समोर आल आहे.



















