सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महेश कुठे यांच्या राधाश्री या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांचा पाहुणचार स्वीकारला, स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला, महेश कोठे, देवेंद्र कोठे, डॉ कोठे, प्रथमेश कोठे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांनी मनोभावे यांचे स्वागत केले यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देवेंद्र कोठे मित्र परिवाराच्या वतीने सोलापूरचे वैभव असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील शरद पवार यांचे छायाचित्र असलेली चादर तयार करून भेट देण्यात आली, हे भेट पाहून साहेब भारावून गेले व प्रशंसा केली व कौतुकाने संपूर्ण शब्द वाचले व सोलापूर शहरातील वस्त्रोद्योगातील सर्व सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी देवेंद्र कोठे यांनी शरद पवार यांचा राज्याचा सह्याद्री देशाचा हिमालय अशा शब्दात गौरव केला.


















