माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा यांनी सोलापुर शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी जुबेर महिबुब कुरेशी यांची निवड केली.
तसेच सोलापुर शहर काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शकील मौलवी यांची निवड करण्यात आली. त्यांचे निवडीचे पत्र जनवात्सल्य कार्यायल येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक तौफ़ीक हत्तूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, तौफ़ीक़ हत्तूरे यांनी मोठ्या मनाने आपल्या अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांना धन्यवाद देतो. जो नव्या नेतृत्वासाठी पद सोडतो तोच मोठ्ठा होत असतो. अशानेच पक्ष वाढत असतो. अल्पसंख्यांक विभागाच्या शहर अध्यक्षपदी तरुण तड़फदार जुबेर कुरेशी यांची निवड झाली तसेच शहर उपाध्यक्ष म्हणून कट्टर काँग्रेसी शकील मौलवी यांची निवड झाली या दोघांचे अभिनंदन सर्वांना सोबत घेऊन समाजहितासाठी काम करा असे म्हणाले.
यावेळी निवड़ीबद्दल प्रतिक्रिया देताना जुबेर कुरेशी म्हणाले की, अल्पसंख्यांक विभागाच्या शहर अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढ़ी, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष वझाहत मिर्झा, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचे आभार मानतो या पदाच्या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या सहकार्याने मुस्लिम, ख्रिश्चन, नवबौद्ध, आणि अल्पसंख्यांक समाजातील इतर घटकांचा शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करणे, आदि कामे करणार आहे. तसेच भाजप आणि इतर काही राजकीय पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून द्वेषाचे राजकारण करत असताना राहुल गांधी यांनी भारत जोड़ो यात्रा काढून नफरत छोड़ो- भारत जोड़ोचा संदेश दिला. त्यांची परिणीति कर्नाटकमध्ये दिसून आली असुन आगामी काळात महाराष्ट्रात, सोलापुर शहर जिल्ह्यात त्यांची पुनरावृत्ती आणि काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, अँड करीमनिस्सा बागवान, रॉकी बंगाळे, तिरुपती परकीपंडला, सैफन शेख, आसिफ तिम्मापूरे, रुस्तुम कंपली, साहेब महागामी, लतीफ शेख, फारुख कमिशनर, रफीक चकोले, सोहेल कुरेशी, इलियास शेख, नूर अहमद नालवार, रजाक कादरी, कय्यूम बलोलखान, पृथ्वीराज नरोटे, शकील शेख, जावेद कुरेशी, सुभाष वाघमारे, मुन्ना बेलिफ़, विकार कुरेशी, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, रूपेश गायकवाड़, खलील कुरेशी, दिनांनाथ शेळके, शाहु सलगर, शिवशंकर अंजनाळकर, सौरभ सालुंखे, मुबीन सय्यद हे उपस्थित होते.



















