मुरारजी पेठेतील हाजी हजरत खान चाळ येथील मोहम्मदीया मस्जिद येथे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या वतीने मंगळवार दिनांक १८.०४.२३ रोजी पवित्र रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी रियाज मोमीन,पिररसाब शेख, युथ प्राइडचे समीर शेख, पत्रकार रिजवान शेख, राजासाहब शेख, वसीम शेख, सुरज चौहान आदी सहभागी झाले होते.
सन २०१२ पासून अखंडितपणे सालाबाद प्रमाणे यंदाच्या ही वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल हाजी हजरत खान चाळ मोहम्मदिया मस्जिद ट्रस्टचे इमाम सगरी, मैनुद्दीन शेख, समीर शेख, जमीर शेख, तन्वीर शेख, नसीर शेख, इकबाल मुलानी, जावेद शेख,आय.एफ.सी ग्रुपचे अध्यक्ष आरबाज इब्राहिम गोलंदाज, बबलू शेख, सरफराज सगरी, वसीम शेख, आझर जमादार, जावेद जमादार, जिशान मुजावर, साबा गोलंदाज यांच्या हस्ते ट्रस्टच्या वतीने देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला.
पीर कट्टा येथे महिलांसाठी दरवर्षी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असते ठिकाणी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी,निसार शेख,यशवंत आंदेवाडी, इम्रान शेख, इलियास शेख, जैद बेलीफ, दिनेश जाधव, सागर भोसले, तबरेज शेख, पवन खांडेकर, राहुल गोयल, सचिन काशीद, नागनाथ मोरे, राजू म्याकल यांनी परिश्रम घेतले.




















