सोलापूर : पुणे डिव्हिजन इन्शुरन्स एजंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार विकास पॅनल ने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले या निवडणुकीत सरकार पॅनलचे तेरा उमेदवार मोठ्याने विजयी झाले आहेत. संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर मध्य विधानसभा अध्यक्ष शशिकला कस्पटे याही विजयी झाल्या आहेत.
नूतन संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून संजय कलापुरे, सदाशिव जिंदे, दयानंद दुड्म, मोहन ननवरे, केदारनाथ मंत्री, भीमराव मस्के, अनिल मोरे, भाऊसाहेब रोडगे, तुकाराम शिंदे, बबन हरवणे, महिला प्रतिनीधी शशिकला कस्पटे वैशाली रोहोकले व इतर मागास प्रवर्गातून प्रवीण भालेराव यांचा समावेश आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सर्व विजय संचालकांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकला कस्पटे या संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, शहराध्यक्ष सुनीता रोटे, प्रदेश सचिव नलिनी चंदिले संगीता जोगदनकर, माजी नगरसेविका रेखा सपाटे यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला.





















