राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील हे पुणे पदवीधर विधान विधान परिषदेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना संधी मिळाली नाही आता येत्या डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधानपरिषद सदस्यांची निवडणूक आहे त्यासाठीसुद्धा उमेश पाटील हे इच्छुक आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ होता
यावेळी सांगोल्याचे एडवोकेट सचिन देशमुख यांनी भाषण करताना उमेश पाटील यांना तुम्ही विधान परिषदेला इच्छुक होता, आताही येणाऱ्या विधानपरिषदेसाठी तुम्ही इच्छुक आहात असे म्हणतात, उमेश पाटील यांनी मी केवळ इच्छुकच राहणार का असे सांगतात उपस्थित सभागृहात एकच हशा पिकला. समोर बसलेल्या मोहिते पाटील समर्थकांनी तुम्ही इच्छुकच राहणार आमदार होणार नाही असे म्हणत मनातल्या मनात लाडू फोडले.
त्यावेळी सचिन देशमुख यांनी यापुढे आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून एक विधान परिषदेचे आमदार निवडावा अशी मागणी करताना येणाऱ्या विधान परिषदेसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितलं जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून यंदाच्या आमदारकीसाठी सर्वांनी एकीची वज्रमूठ बांधावी तेव्हाच आपला ‘अर्थ’ कळेल. ही निवडणूक पैशाची झाली आहे,ज्याच्याकडे पैसा त्यालाच उमेदवारी मात्र जो अभ्यासू आहे, जनतेसाठी काम करतोय त्यांना कधी संधी मिळणार? असा प्रश्न सचिन देशमुख यांनी उपस्थित केला.
कार्यक्रमाला डायसवर ज्येष्ठ सदस्य भारत शिंदे व वसंत नाना देशमुख हे सुद्धा उपस्थित होते या दोघांनीही आमदारकीसाठी इच्छा व्यक्त करावी असेही एडवोकेट देशमुख म्हणाले. हे सर्व सुरु असताना खालूनच माळशिरस तालुक्याचे सदस्य अरुण तोडकर यांनी मी पण इच्छुक आहे असं सांगितलं.


















