सोलापूर : विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या वतीने कोव्हिड काळात विविध समाजोपयोगी कार्य करणाऱ्या सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार वितरण व पोलीस प्रशासनास सहकार्य केलेल्या पोलीस मित्रांना पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
जुळे सोलापुरातील मांगल्य मंगल कार्यालय येथे या पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश उत्सव नेतृत्वाची पहिली पायरी असून गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक जण राजकारणामध्ये यशस्वी झालेले आहेत असे मनोगत पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर व्यक्त केले.
सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाचा प्रथम क्रमांक होडगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ द्वितीय क्रमांक ओम गर्जना सांस्कृतिक व कला मंडळ तृतीय क्रमांक निर्मिती गणेश उत्सव मंडळ यांना ट्रॉफी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्याच बरोबर गणेशोत्सव विसर्जन च्या दिवशी पोलीस प्रशासनास सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस मित्राचा प्रशस्तीपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले आरपीआयचे कार्याध्यक्ष श्याम धुरी प्राध्यापक अंबादास पांढरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी मस्के पोलीस उपनिरीक्षक कैलास वाघमारे पोलीस उपनिरीक्षक सुराज मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रफुल्ल वजमाने भीमाशंकर भिंगे अनिल गवसाने अरविंद शेळके सिताराम बाबर परमेश्वर माळगे विशाल ताकमोगे श्याम पाटील राजू चव्हाण अमेय केत सोमनाथ निंबाळ यांच्यासह शांतता कमिटी सदस्य व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

















