सोलापूरच्या काँग्रेस भावनांमध्ये गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक झाली, या बैठकीत मोहोळ तालुक्यातील विविध पदाधिकार्यांच्या तक्रारी, अडचणी, समस्या, जाणून घेतल्यानंतर भाषणाला उभारलेले माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी आपल्या ग्रामीण ढंगाच्या स्टाईलने उपस्थितांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसला खमक्या अध्यक्ष द्या अशी मागणी अनेक वेळा झाली, राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला खमक्या अध्यक्ष पाहिजे होता नाना पटोले यांच्या रूपाने खमका अध्यक्ष मिळाला. सोलापूर जिल्ह्याला युवा चेहरा असलेले धवलसिंह मोहिते पाटील खमके अध्यक्ष मिळाले आता तालुक्याला पण खामका अध्यक्ष दिला जाईल, त्यामुळे कुणी घाबरू नका पक्षवाढीसाठी झटा, अरे वाघाला गोळी घालून ठार मारणारा सिंह तुम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलाय घाबरता कशाला? या शब्दात माजी आमदार रुपनवर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना बळ दिले.
मी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या शेवटच्या भाषणात सांगितले, मी यापुढे जिल्हा परिषदेत येणार नाही आता आमदार होणार तेव्हा अनेकांनी माझी चेष्टा केली परंतु मी आमदार झालो, एक रूपाया खर्च केला नाही, कोणता फॉर्म भरला नाही, कोणती कागदपत्रे गोळा केली नाहीत, गुलाल उधळला नाही, हलक्या वाजवल्या नाहीत, कोणाकडे मागणी केली नव्हती मात्र झालो की नाही आमदार, निश्चय केला होता, पक्षावर विश्वास ठेवला होता.
त्यामुळे आजपासून काँग्रेस वाढीसाठी वाढीचा निश्चय करा तालुक्यामध्ये बैठका आयोजित करा अध्यक्षांना प्रत्येकाच्या घरोघरी बोलवा, शाखा स्थापन करा, चर्चा झाली पाहिजे, बघा कसा पक्ष वाढतो का नाही मोहोळ तालुक्यात. जो तालुका अध्यक्ष देईल तो खमका असेल त्याला काम करण्यास संधी द्या कोणताही खोडा घालू नका अशा सूचना रुपनवर यांनी केल्या.



















