“येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वळसंग येथील उड्डाणपुलाच्या खाली एसटी बसेसना थांबा द्या अन्यथा बुधवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांन समवेत प्रहार स्टाईलने एसटी रोको आंदोलन करणार असा इशारा मोशीन तांबोळी यांनी दिला”
सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील वळसंग येथील उड्डाणपुलाच्या खाली पूर्वीप्रमाणेच राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना थांबा मिळावी अन्यथा बुधवारी महाविद्यालयीन विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी गावकरी यांच्या उपस्थितीत महामार्गावर एसटी रोको आंदोलन प्रहार स्टाईलने करण्यात येईल असा इशारा दक्षिण सोलापूर प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी निवेदनाद्वारे एसटी आगार प्रमुखांना दिला आहे. सध्या वळसंग येथे उड्डाणपूल कार्यान्वित झाल्याने या ठिकाणी एसटी बस ना पूर्वीच्या ठिकाणी थांबे मिळत नाहीत सोलापूर अक्कलकोट येथे जाणाऱ्या महाविद्यालयीन तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय महामार्गावर जाऊन एसटीच्या प्रतीक्षेत थांबावे लागत आहे.
महामार्गावर जाताना विद्यार्थ्यांचे या मार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही वळसंग परिसरातील छोट्या-मोठ्या खेडेगावातील नागरिकांना देखील एसटीचा प्रवास करण्यासाठी वळसंग येथेच यावे लागते त्यांची ही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे म्हणून एसटी महामंडळाने पूर्वीच्याच ठिकाणी उड्डाणपुलाच्या खाली एसटी बसेस ना थांबा द्यावी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे दक्षिण सोलापूर प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मोशीन तांबोळी यांनी सांगितले.
यासंदर्भात सोलापूरचे आगारप्रमुख यांना निवेदनाद्वारे पूर्वीच्या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्रातील सर्व आगारांचे एसटी ची थांबा मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये वळसंग येथे पूर्वीचे ठिकाणी थांबा न मिळाल्यास बुधवारी राष्ट्रीय महामार्गावर शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच गावकऱ्यांच्या वतीने एसटी रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी तांबोळी यांनी दिला.


















