आटपाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर व अन्य एका इसमा विरुद्ध सांगली पोलीस ठाण्यात भारतीय दंड सहिता व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर व अन्य इसमास में न्यायालयासमोर हजर केले असता वरील दोन्ही आरोपींविरुद्ध पिटा कायदा अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा युक्तिवाद करून सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे निर्णय दाखल केलेले होते, त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर व अन्य एका इसमाची में न्यायालयाने जामिनावर मुक्तता केलेली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, सांगली यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले.
त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सांगली यांनी आरोपींविरुद्ध प्रोसेस इश्शूचा आदेश पारित केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या वतीने अॅड. नीलेश जोशी व अॅड. पुणेकर यांच्यामार्फत सांगली येथील मे जिल्हा न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशास आव्हान दिलेले होते.
सदर रिव्हिजनकामी सांगली पोलिसांनी आटपाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी सूडबुद्धीने व पोलीस खात्यातील अंतर्गत स्पर्धेतून कार्यवाही केल्याचे तसेच सदरच्या गुन्ह्यात आरोपींचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याबाबतचा कोणताही सक्षम व सबळ पुरावा नसल्याचे तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याची कोणतीही कलमे आरोपीस लागू पडत नसल्याने आरोपीविरुद्ध पोलिसांनी आकसापोटी दाखल केलेल्या दोषारोप पत्राची दखल घेऊ नये व सदरच्या गुन्ह्यातून आरोपींना वगळण्यात यावे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.
सदरचा युक्तिवाद मान्य करून सांगली येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. पी. पोळ साहेब यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर व अन्य एका इसमास गुन्हातून वगळण्याबाबत आदेश केलेले आहे. सदरच्या आदेशामुळे सांगली पोलिसांच्या तथाकथित मनमानी व चुकीच्या कारवाईस मोठी चपराक बसून प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध अन्याय केल्या बाबतची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
सदर प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या वतीने अॅड नीलेश जोशी व अॅड. पुणेकर यांनी काम पाहिले.



















