सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्षपदी शंकर कवडे व उपाध्यक्षपदी सुक्षा काटकर तर सदस्यपदी सरपंच मनिषा क्षिरसागर, पार्वती नवले यांची निवड झाली.
या निवडीमुळे त्यांचा शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी गावचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत हक्के, माजी सरपंच शिवराम भगत, माजी सरपंच भीमा कवडे ,शिवसेना नेते ग्रा.प. सदस्य सखाराम वाघ, आरपीआयचे पीजी गट तालुकाध्यक्ष किशोर चौधरी ,माजी ग्रामपंचायत सदस्य भिवा कवडे , मा. ग्राप सदस्य भीमा मोटे , मा.ग्राप सदस्य शारदा कवडे,जगन्नाथ कवडे ,वामन चौधरी, शिवाजी काटकर, लक्ष्मण हक्के ,तानाजी हक्के, मारुती देवकर, लक्ष्मण नवले ,विश्वनाथ हक्के, संकेत सोलंकर ,बाबा सोलंकर, दत्तात्रय मळगे ,विनोद पवार , महेश कवडे, शिवशंकर कवडे,प्रियांका मळगे , मंजना सोंडगे,अंजना नवले, सुवर्णा नवले ,महादेवी नवले ,विमल गिरी, अनिता मळगे, उपस्थित होते. नुतन अध्यक्ष शंकर कवडे यांनी येणाऱ्या काळात गुणवत्ता वाढ व डिजीटल शाळा करण्याचे मनोगत व्यक्त केले.

















