माजी आमदार दिलीप माने यांचे मित्र पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांच्या शिक्षण संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनाचे आयोजन होनसळ याठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाला उत्तर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी समाधान नागणे, विद्यमान गटविकास अधिकारी प्रशांत देशमुख, सभापती रजनी भडकुंबे यांच्यासह तालुक्यातील नेतेमंडळी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप माने यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांना उद्देशून तुम्ही वडाळ्याचे नेते आहात, भावी जिल्हा परिषद सदस्य असे म्हणल्यावर नागणे यांनी पुढील पंचवीस वर्ष साहेब मला संधी नाही असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला त्यानंतर “पीए”चा विषय निघाला तेव्हा ही हस्यांचे फवारे उडाले, त्यानंतर माने यांनी उपस्थित गटविकास
अधिकारी यांना पंचायत समिती मध्ये चांगले काम करण्याचे सल्ले दिले पहा या मजेदार किस्स्यांचे व्हिडिओ…..
















