सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
मंद्रूप गावच्या सरपंच अनिता तुकाराम कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य रियाना गफूर शेख यांनी हा ठराव सभेसमोर ठेवला त्या ठरावाला सूचक अल्ताफ शेख तर सचिन फडतरे यांनी अनुमोदन दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय गायरान जागेवरील दुकानगाळे व घरांबाबत महाराष्ट्र सरकारला गायरान जागेवरील अतिक्रमण (घरे व दुकानगाळे) याबाबत मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू असताना २० जुलै २०२३ रोजी विधानभवनावरील गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांचा लाखोंचा महामोर्चा काढून ते अतिक्रमण काढणेस सद्यस्थितीस स्थगिती देऊन महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमण धारकास न्याय मिळवून दिल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्वसदस्य ग्रामपंचायत मंडुप, विविध संस्थांचे पदाधिकारी, गाळेधारक लाभार्थी व सर्व ग्रामस्थ मंडुप यांचेकडून….. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. आदरणीय. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हार्दिक अभिनंदन….!!