सोलापूर : श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी, वडाळा येथे शिक्षक दिन साजरा झाला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य जितेंद्र कंदले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बी. फार्मसी प्रथम वर्षातील सृष्टी पुजारी हिने प्राचार्य पदाचा कार्यभार साकारला. त्याचप्रमाण. दर्शन लोखंडे, आसावरी चव्हाण,. श्रीकृष्ण निर्मल, राजेश क्षीरसागर यांनी शिक्षक अध्यापनाचे कार्य केले आणि काही विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणे केली त्यात कू.अमृता कोरके,.धनश्री तळेकर, . साक्षी गुंड, . दर्शन लोखंडे, वैष्णवी पवार,. महेश मठपती, . आसावरी चव्हाण यांचा समावेश होता
यावेळी प्रा. वर्षा जकूणे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. रेवती चिल्का यांनी आभार प्रदर्शन केले त्याचप्रमाणे प्रा. स्मिता पाटील, प्रा. अंबादास चिक्कलें, प्रा. यास्मीन हिंगणेकर व प्रा. मिसबाह बाडेवाले यांनी कार्यक्रम पूर्ततेसाठी अथक परिश्रम घेतले.



















