सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन यांचा विवाह सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात वेळापूर याठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थिती लावून लग्नाची शान वाढवली,
या लग्नाला शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले दरवेळेस पवार साहेब हे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गाडीत बसतात, साहेबांचे सारथ्य केल्यानंतर दिपक आबा यांचा ऊर भर भरून येतो, शनिवारी मात्र साहेबांचे सारथ्य करण्याची मोठी संधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांना मिळाली.
साहेब उमेश यांच्या Morris Garages या ब्लॅक गाडीत बसले, यावेळी त्यांच्यासोबत दीपक आबा साळुंखे पाटील, जिल्हा अध्यक्ष काका साठे, विजय शिर्के, आमदार यशवंत माने,मनोहर सपाटे यांची उपस्थिती होती, आपल्या गाडीमध्ये साहेब बसल्याने उमेश पाटील यांना साहेबांचं सारथ्य करण्याचं आपलं अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगितलयं. हा आनंद त्यांनी आपल्या युट्युब अकाऊंटवर व्हिडिओ टाकून शेअर केला आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड हे विजयी झाले त्यांच्या जागेवर उमेश पाटील हे सुध्दा इच्छुक होते मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्वकीयांनी विरोध केल्याने पक्षाने शेवटी सांगलीतील लाड यांना उमेदवारी दिली, आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या आमदारकीची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे त्यासाठी ही उमेश पाटील इच्छुक आहेत.
उमेश पाटील यांचा प्रदेश प्रवक्ते, जिल्हा परिषद सदस्य, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे, कार्यकर्त्यांचे काम करण्यात त्यांची चांगली हातोटी आहे.
दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये उमेश पाटील यांनीही आपलं काम, कर्तुत्व, आपल्या प्रवक्ते पदाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील भल्याभल्या विरोधकांची तोंड बंद केले आहेत, याच जोरावर पक्षाचे लक्ष वेधून घेतले आहे. पक्षाने निश्चितच आगामी विधान परिषदेसाठी आपला विचार करावा अशी अपेक्षा उमेश पाटलांची आहे.





















