सोलापूर – रे नगर मधील तीस हजार लाभार्थ्यांना नाममात्र म्हणजे फक्त पाचशे रुपये दराने नवीन वीज जोडणी देण्याबाबत दोन नोव्हेंबर रोजी असंघटित कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पन्नास ते साठ हजार श्रमिकांनी सहभाग नोंदविला होता. श्रमिकांनी दिलेल्या लढ्याला व सिटूने काढलेल्या मोर्चाला यश आले असून लालबावट्याचा विजय झाल्या असल्याचे मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले आहे.
महावितरणने आडम मास्तर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगारांसाठी बांधण्यात येत असलेल्या घरकुलांना वीज पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्याकडून फक्त पाचशे रुपयाचे शुल्क भरून घेण्यात यावे अशा सूचना मुख्य कार्यालयाकडून मुख्य अभियंता महावितरण बारामती परिमंडळ यांनी भ्रमणध्वनी द्वारे सुरक्षा ठेव रकमेबाबत दिल्या आहेत त्याप्रमाणे प्रक्रिया शुल्क 120 रुपये अधिक १८ टक्के जीएसटी प्रति विज जोडणी व सुरक्षा ठेव रक्कम 380 रुपये प्रति विज जोडणी पहिल्या वीज बिलामधून पुनर प्राप्त करून घेणे बाबत सूचना दिल्या असल्यामुळे फक्त पाचशे रुपयांमध्ये या परिसरातील नागरिकांना वीज जोडणी करून देण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या महामोर्चात सिटू चे राज्य महासचिव ॲड. एम,एच.शेख, नलिनीताई कलबुर्गी ,युसुफ मेजर, नसीमा शेख, ,दीपक निकंबे, ॲड.अनिल वासम, विल्यम ससाणे,वसीम मुल्ला,वीरेंद्र पद्मा,विक्रम कलबुर्गी, दाऊद शेख,सलीम मुल्ला,सनी शेट्टी, व्यकंटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी,शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला,शकुंतला पानिभाते आदीसह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेतले.