राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 2 सप्टेंबर रोजी सोलापूर दौर्यावर येणार असल्याची माहिती आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरांमध्ये पॉवरफूल होत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतून तसेच एम आय एम मधून अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे व एमआयएमचे नगरसेवक तोफिक शेख या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
सोलापूर शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होत असून मागील दीड ते दोन वर्षात शहरामध्ये सुमारे एक हजारहून अधिक नवीन पदाधिकार्यांच्या निवडी झाल्या आहेत, या पदाधिकार्यांशी चर्चा आणि भविष्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. दोन सप्टेंबर रोजी दौरा निश्चित आहे मात्र अजून अधिकृत आलेला नाही असे सांगण्यात आले.


















