सोलापूर : राष्ट्रपुरुष, महापुरुष आणि थोर व्यक्तींच्या जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यासंदर्भात शासनाने जाहीर केलेल्या यादीत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीचा समावेश नसून मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने आदेश देऊन आज जयंतीचा समावेश यादीत करून शासन स्तरावर दिवस शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये साजरा करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी व अनेक शिव, शंभुप्रेमीनी केली होती. ही मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली असून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती दिनविशेष यादीत समावेश करून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरा करण्याचा शासनाने आदेश दिले आहेत.
यानिमित्त सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी त्यांचा सत्कार केला. नगरसेवक विनोद भोसले यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.
यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, देवा गायकवाड, तिरुपती परकीपंडला, विनोद गायकवाड, समीर काझी, सुभाष वाघमारे, नागनाथ शावने, सोमनाथ व्हटकर, अप्पा सलगर, वसिष्ठ सोनकांबळे, शिवशंकर अंजनाळकर, सुमन जाधव, शोभा बोबे, चंदा काळे, मुमताज शेख, प्रमिला तुपलवंडे, बसंती सालुंखे, मुमताज तांबोळी, श्रीकांत गायकवाड, महेश वड्डेपल्ली, संकेत माने, श्रीधर वाघमोड़े, गणेश वड्डेपल्ली, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.