सोलापुरात मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात किमा 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त केले. वाघ म्हणाल्या, राज्य मंत्रिमंडळात तीन ते चारजणींना संधी द्या. आमच्याकडे कॅलिबर महिला आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात १०० टक्के महिलांना संधी द्या, असं चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आपल्याकडे महिलेलाच महिला बालकल्याण खातं दिलं जातं. पहिल्यांदाच पुरुषाला महिला बाल कल्याण खातं देण्यात आलं आहे. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. पुरुषांनाही कळू द्या महिलांच्या समस्या काय आहे. या निमित्ताने महिलांच्या समस्या पुरुषांनाही समजेल, असं त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी महिला नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. फक्त तिकीट घेऊन जमत नाही. निवडून आलं पाहिजे. इलेक्ट्रोल मेरीट लागतं. सक्षम असलेल्या महिलेला संधी दिली पाहिजे. पण केवळ महिला आहे म्हणून मला संधी द्या या मताची मी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

















